You are currently viewing कणकवली तालुक्यातील फोंड्या पासून फर्लांगभर अंतरावर पारावरच्या कंपाऊंडमध्ये जुगाराचा अड्डा

कणकवली तालुक्यातील फोंड्या पासून फर्लांगभर अंतरावर पारावरच्या कंपाऊंडमध्ये जुगाराचा अड्डा

*कणकवली तालुक्यातील फोंड्या पासून फर्लांगभर अंतरावर पारावरच्या कंपाऊंडमध्ये जुगाराचा अड्डा*

*दररोज रात्री ९.०० वाजता सुरू होते मैफिल*

कणकवली तालुक्यातील फोंड्यापासून अलीकडे फर्लांगभर अंतरावर वीजनगर मध्ये पारावरील कंपाऊंड येथे रोज रात्री ९.०० वाजता “नो लिमिट जुगार” अड्डा सुरू असतो. येंगुर्ल्याचा सुगल्या, पारावरचा रोहील्या, पारावराचा विठ्ठल, आणि दात पडक्या आप्पा असे तक्षिमदार मिळून रोज रात्री जुगाराचा अड्डा चालवीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
राधानगरी, फोंडा, आणि कणकवली येथील नावाजलेले जुगारी खेळी या अड्ड्यावर आपले नशीब आजमावत असतात. टींगेल मेंथरो आणि दात पडक्या आप्पा हे मंगळवार, बुधवार, गुरुवारी पार्टनरशिप मध्ये कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे जुगाराचा अड्डा चालवतात. त्यामुळे कितीही बेरोजगारी असो वा उद्योगधंदे बंद पडू देत, जुगारासारखे अवैद्य व्यवसाय मात्र खाकीच्या आशीर्वादाने जिल्हाभर सुरू असतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 6 =