You are currently viewing आयुर्वेदिक कॉलेजचे निवृत्त प्राचार्य डाॅ. ओमप्रकाश पांडे यांचे निधन

आयुर्वेदिक कॉलेजचे निवृत्त प्राचार्य डाॅ. ओमप्रकाश पांडे यांचे निधन

सावंतवाडी
सावंतवाडीतील कै. भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक कॉलेजचे निवृत्त प्राचार्य डॉ. ओमप्रकाश पांडे (वय ७४) यांचे रविवारी सकाळी ८ च्या सुमारास उत्तरप्रदेश- अशोकपूर येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. अचानक ताप येऊन प्रकृती अस्वास्थ्य झाल्याने त्यांना नजिकच्या रूग्णालयात नेण्यात आले.

परंतु रूग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. प्राचार्य पांडे हे लेह-लडाख येथे कार्यरत असलेले आय.पी.एस. अधिकारी राजीव पांडे यांचे वडिल होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्राचार्य पांडे हे १९८१ ते २०११ अशी तब्बल ३० वर्षे सावंतवाडीतील आयुर्वेदिक काॅलेजमध्ये कार्यरत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =