You are currently viewing शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रज्ञा राणे भाजपमध्ये दाखल…

शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रज्ञा राणे भाजपमध्ये दाखल…

उमेदवारी नाकारल्याने नाराजी; भाजपकडून मात्र अभिनव नगर मधून संधी…

कुडाळ

येथील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रज्ञा राणे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना वॉर्ड क्रमांक १४ मधून भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या पुढाकाराने त्यांनी पक्षाला रामराम केला आहे.
गेली अनेक वर्षे त्या शिवसेनेच्या कार्यकर्ते म्हणून काम करत होते. मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत,तालुका अध्यक्ष विनायक राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.त्यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेचे गटनेते रणजीत देसाई,ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर,कुडाळ माजी नगराध्यक्ष ओंकार तेली,शहराध्यक्ष राकेश कांदे,प्रशांत राणे,राजा धुरी,प्राजक्ता शिरवलकर,नयना मांजरेकर, रीना पडते,राजेश पडते,सुधीर चव्हाण,विजय सावंत,सचिन सावंत,रामू मांजरेकर,बंड्या शिरसाट,शुभम राणे,वरूनेश्वर राणे,विनोद सावंत,मनोज सावंत आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा