You are currently viewing सातार्डा माऊली जत्रोत्सव 7 रोजी तर रवळनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव 8 नोव्हेंबरला

सातार्डा माऊली जत्रोत्सव 7 रोजी तर रवळनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव 8 नोव्हेंबरला

सावंतवाडी :

 

सातार्डा गावचे जागृत ग्रामदैवत श्री रवळनाथ देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव ७ नोव्हेंबरला, तर श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानचा पारंपरिक कौल सोहळा ८ ला होणार आहे. जत्रोत्सवानिमित्त सकाळी देवस्थानतर्फे विविध धार्मिक कार्यक्रम, ओट्या भरणे, भाविकांची गाऱ्हाणी होणार आहेत. रात्री अकराला पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर एकला आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. दुसऱ्या दिवशी सायंकाळी श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानचा पारंपरिक कौल सोहळा होणार आहे. सायंकाळी चारला सोहळ्याला सुरुवात होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थान उपसमितीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =