You are currently viewing सावंतवाडीत विद्यार्थ्यांची “फिल्मीस्टाईल” मारहाण, दोघांना तळ्यात फेकले…

सावंतवाडीत विद्यार्थ्यांची “फिल्मीस्टाईल” मारहाण, दोघांना तळ्यात फेकले…

सावंतवाडीत विद्यार्थ्यांची “फिल्मीस्टाईल” मारहाण, दोघांना तळ्यात फेकले…

लाठ्या-काठ्या मारुन गाडीचे नुकसान; तब्बल ८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल…

सावंतवाडी

एकमेकांना खुन्नस देण्याच्या रागातून येथील मोती तलावाच्या काठावर “फिल्मीस्टाईल” पध्दतीने हातात लाठ्या-काठ्या घेवून तालुक्यातील एका खासगी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे दोन गट भिडले. यावेळी संतप्त झालेल्या एका गटातील काहींनी दोघा युवकांना थेट मोती तलावात ढकलून दिले. या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. विश्वतेज गोरड आणि आदित्य राठोड अशी तळ्यात ढकलण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. दरम्यान या प्रकरणी राठोड याने दिलेल्या तक्रारीनुसार स्वप्नील जाधव (वय २०), ओमप्रसाद जाधव (वय २१) आणि स्वप्नील हातागळे (वय २०) सर्व (रा. सावंतवाडी) यांच्यासह अन्य ५ अज्ञात विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, यातील दोन्ही गटातील विद्यार्थी राजवाडा परिसरात असलेल्या एका खानावळीत जेवणासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्यात एकमेकांना खुन्नस देण्यावरुन वाद झाला. यावेळी तेथून सर्वजण राजवाडा परिसरात भांडत आले. त्यावेळी वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. यावेळी त्यातील एका गटाने गाड्याच्या काचा फोडत दोघांना मारहाण केली तर इतक्यावर न थांबता राठोड व गोरड या दोघांना तळ्यात ढकलून दिले.
हा प्रकार घडल्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या अन्य काहींनी आरडाओरड करीत पळ काढला. मारामारी सुरू असल्याने काही जणांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर तळ्यात पडलेल्या दोघांना स्थानिक व पोलिसांच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली यावेळी पूर्ववैमनस्यातून हा वाद घडला, असे त्या युवकांकडून सांगण्यात आले. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांसह अन्य अज्ञात ५ जणांच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात गैरकायदा जमाव, शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने मारहाण करणे, दुखापत करणे आणि नुकसान करणे आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − five =