कोळपे येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या….

कोळपे येथील इसमाने राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. महादेव सखाराम कांबळे वय ४५ असे मयत इसमाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी रात्री ९.३० ते शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची खबर त्याचे भाऊ अशोक सखाराम कांबळे यांनी वैभववाडी पोलिसात दिली.
मयत महादेव कांबळे व त्याची पत्नी यांच्यामध्ये पाच-सहा वर्षांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणातून महादेव याने पत्नीच्या हातावर हत्याराने वार केला होता. दरम्यान त्याला पोलीस कोठडी झाली होती. त्यावेळे पासून तो एकटाच घरी राहत होता.भांडण झाल्यानंतर त्याची पत्नी कोळपेहून मुंबईला गेली होती. सोबत आपल्या बरोबर दोन मुलांना घेऊन गेली होती. मृतदेह उंबर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. त्याच्या पश्यात पत्नी, दोन मुलगे व भाऊ असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा