You are currently viewing होळी

होळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ सुचिता कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*होळी*

रंगीबेरंगी दुनिया सारी
नाही रंगांची वानवा
रंग बदलण्यात पटाईत
तू सरड्याहून मानवा

स्वभाव माणसाचा
जणू रंगाची पेटी
चेहरे वाचावे कसे?
तिथे रंगांची दाटी

रंगात मिसळता रंग
होई वेगळा श्रीरंग
बनवला कुठलाही रंग
विसरू नको तरी मूलरंग

मिसळून माणसात माणसा
जोड नात्यांची मालिका
नको विसरू आप्तजन
तुझी हृदयाची मलिका

आज करतोस धुलिवंदन
कर मातापित्यांना नमन
जगी आलास त्यांच्यामुळे
ते पृथ्वीवरील देवगण

सण हा पवित्र बंधाचा
बांधू नात्यांची मोळी
रंगून नात्यात साऱ्या
साजरी करूया होळी

सुचिता कुलकर्णी
मीरा रोड
+91 98924 16923

प्रतिक्रिया व्यक्त करा