You are currently viewing छोटा अभंग

छोटा अभंग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री भावना इटकीकर यांची अभंग रचना*

 

*छोटा अभंग*

 

माझ्या सासरची बाग |

पुष्पे नाचे आनंदात ।।

 

तरुवेली गुंफितीया।

किती सुंदर ग मळा ।।

 

शोभीवंत परसबाग ।

रानमेव्यांची आरास।।

 

आरोग्यसंपदा देती।

वाटसरू मुग्ध होती।।

 

माझा सुखाचा ग मळा ।

नीर वाहे झरझरा।।

 

तृप्त माझीया मनीचा।

आत्मा जणू संसाराचा।।

 

सौ.भावना अजय ईटकिकर

प्रतिक्रिया व्यक्त करा