You are currently viewing इष्काची होळी

इष्काची होळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम लावणी*

*इष्काची होळी*

तुम्हीच आहात ह्या बागेचे माळी
चला इथेच साजरी करा होळी | धृ|

झिंग झिंगाट इष्काचा प्याला
राहिले ना बाळ सरलेत सोळा
नका समजू स्वतः शंभू भोळा
असुद्या हो रंग माझा सावळा
अंगात तंग झालीय नवी चोळी
चला इथेच साजरी करा होळी |1|

तुम्ही आहात कृष्ण अवतारी
सखया मी राधिका रंगबावरी
दूध घेऊन चालले मी बाजारी
झुरते विरही नका बाळगू दुरी
घ्या जवळी पसरते मी झोळी
चला इथेच साजरी करा होळी |2|

पाजते अस्सल मोहाची दारू
मग सुसाट सुटेल तुमचा वारू
तुम्ही चुकार चुकलेले वाटसरू
हळूच जाळ्यात घावल पाखरू
रंगूया रंगात सोडून द्या पातळी
चला इथेच साजरी करा होळी |3|

का फिरतात सखया दारोदारी
मी अजूनही नवतरणी कोरी
बोलवा कधीही लावते हजेरी
इष्काची नशा लई लई न्यारी
नशेबाज मी इष्काची इंगळी
चला इथेच साजरी करा होळी |4|

विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664

प्रतिक्रिया व्यक्त करा