You are currently viewing भाव तुझ्या चेहऱ्यावरचे

भाव तुझ्या चेहऱ्यावरचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ यांची काव्यरचना*

भाव तुझ्या चेहऱ्यावरचे
खूप देखणे होते
तसेच तुझे वागणे होते
झाकू नकोस ओंजळीत
रूप तुझे
नजरेचे एकसारखे बघणे होते

थांब जराशी तू नको जावूस
वळून मागे नको पाहुस
नको टाकूस तुझ्या नजरेचा कटाक्ष
आडोसा घेवून का तुझे हसणे होते
तुझ्यासाठीचतर माझे जगणे होते

कळत होते भाव तुझ्या चेहऱ्यावरचे
छळत होते नाव माझ्या हातावरचे
का बघतेस वाट मी येण्याची
पाऊले तर तुझ्याच दिशेने वळत होते

हळूच खुलते खळी
तुझ्या गालावर
गोड हसू आणते
माझ्या ओठांवर
काळजात माझ्या येण्यास
कितीदा होकर घेते
का माझ्या नजरेची
तू शिकार होते

बघ रात्रही कशी सजून आली
काळोखाला गर्द करून गेली
चांदण्यारातीतही रूप तुझे
लावंण्याचेच दिसत होते
मिणमिणते काजवेही
तुला पहात होते

नको आता कसलेच बहाणे
नको तुझे दुर दुर जाणे
पाहिले जगाने भाव प्रितीचे
एकात एक होवून
एकमेकात रहाणे होते
एकमेकास डोळेभरून
पहाणे होते

*संजय धनगव्हाळ*
धुळे
९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 4 =