You are currently viewing !! श्री !!  !! ऋतू सोहळे !!

!! श्री !! !! ऋतू सोहळे !!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांनी सहजीवनाच्या ४६ वर्षांच्या आनंदी, यशस्वी वाटचाल वाटचाली निमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*.

!! श्री !!

!! ऋतू सोहळे !!

सनईच्या सुरावटीने
वाटचाल सुरू झाली
ऋतुऋतुंचे सोहळे
आनंद वाटत गेली ||

नव्या कळ्या उमलल्या
वसंत फुलूनी आला
बाललीलांच्या संगती
धूंवाधार बरसला ||

कित्येक नाती जुळत गेली
फुलली जणू तारांगणे
अखंड त्यातूनी बरसते
शरदाचे सुखद चांदणे ||

ज्येष्ठांचे हात सूटत गेले
पानगळ धीराने साहिली
नातवंडांच्या रूपाने
नवीन पालवी फुलली ||

तुझ्या-माझ्या सोबतीने
ऋतुसोहळे सजले
संसाराचे भावविश्व
मनाजोगते फुलले ||

सनईचे सूर आजही
करिती साथसंगत
तुझी माझी अशीच राहो
जन्मोजन्मी अखंड सोबत ||

ज्योत्स्ना तानवडे.

पुणे.५८

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =