You are currently viewing वासुदेव उना…

वासुदेव उना…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वासुदेव उना…*

 

भला पायठाम्हा देखा मना दारम्हा नाचना

मोरपिस डोकावर माले मोरज वाटना..

 

तंग बाराबंदी बांधी काचा धोतरना मारा

हाते चिपळ्या लिसन फिरना तो गरागरा..

 

घरेघर आंगनम्हा हाऊ करे हो पुकारा

लिसनी देवबानं नाव टाय फिरे गरगरा..

 

विठोबाच्या ग नावानं वाढ लक्षुमी पार्बती

झोयी फैलाये समोर दाने झोयीत पडती..

 

सुपडं लिसन हातम्हा कसा मारे तो गिरकी

पूर्वजना नावे लेये भेटो त्यासले सद् गती..

 

नऊवारी नि पदर बाया उभ्या दारम्हानं

नाचे वासुदेव तठे भरीजाये ते आंगन..

 

घडीघटका त्या दोन बाया हासेत गालात

उभा जन्म नातरीहो त्यासना जासना चुलात..

 

नहीत आते वासुदेव नंदीवाला त्या बैलना

इतिहास वासुदेव रोग नवाज फैलना…

 

नवा जमानामा आते चित्राम्हान वासुदेव

देखा बठ्ठी बुडीगई जुना जमानानी ठेव..

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा