You are currently viewing विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्कम माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी..

विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्कम माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी..

सिंधुदुर्गनगरी  

कोकण विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्कम माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. असे आदेश, सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी दिले आहेत.

               माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्कम माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी आणि ऑनलाईन चलन डाऊनलोड केल्यानंतर चलनावर नमूद असलेली रक्कम विहित मुदतीत त्यांच्या त्याच बँकेच्या खात्यामधून एनईफटी/आरटीजीएसव्दारे चलनावरील नमूद बँक अकाऊंटनंबर (Alpha Numeric) व आयएफएससीकोड UTIBOCCH274 (युटीआयबी शून्य सीसीएच274) प्रमाणे मंडळाकडे वर्ग करावयाची आहे.

            कोकण विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12वी) नोव्हेंबर व डिसेंबर 2020 करिता विद्यार्थ्याची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर केल्यानंतर माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षा,शुल्काचे ॲक्सीस बँकेचे चलन ऑनलाईन तयार होणार आहे. ते संबंधितांनी डाऊनलोड करुन घ्यावयाचे आहे. परीक्षा शुल्क प्रचलित पध्दतीने बँक ऑफ इंडिया मध्ये भरणा न करता ॲक्सीस बँकेत भरणा करण्यात यावी.

            माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी एनईएफटी/ आरटीजीएस केलेली रक्कम त्यांच्या खात्यातून वजा झाली आहे. किंवा नाही तसचे अकाऊंट नंबर व आएफएससी कोड चुकीचा नमूद केल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली किंवा नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांची राहील तसेच माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे शुल्क मंडळाकडे जमा झाल्याशिवाय त्यावरील पुढील प्रक्रीया होणार नाही याची दक्षता सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी घ्यावी असे आवाहन, सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =