You are currently viewing मालवणातील बिळवस – हुमरोस साकव खचल्याने धोका

मालवणातील बिळवस – हुमरोस साकव खचल्याने धोका

तातडीने उपाय योजना न झाल्यास शाळेतील मुलांची गैरसोय

 

मालवण :

 

मालवणातील बिळवस – हुमरोस मार्गावरील असलेला साकव खचल्याने धोका निर्माण झाला आहे. हुमरोस वाडीतील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी याच साकवाचा वापर वाहतुकीसाठी करतात. सदर मार्ग जवळचा असल्याने विद्यार्थी प्रवास करताना साकव खचल्यास दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता आहे.

तातडीने उपाय योजना न झाल्यास शाळेतील मुलांची गैरसोय होणार आहे. दरम्यान सरपंच सौ. मानसी पालव, ग्रामसेवक युगल प्रभुगावकर यांनी तातडीने भेट देत पाहणी करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहेत. प्रशासनाने तातडीने उपाय योजना करण्याची मागणी युवा कार्यकर्ते राहुल सावंत यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 10 =