You are currently viewing सिंधुदुर्ग विमानतळामध्ये होणाऱ्या नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे

सिंधुदुर्ग विमानतळामध्ये होणाऱ्या नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे

कुडाळ

सिंधुदुर्ग विमानतळामध्ये होणाऱ्या नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी कुडाळ तालुका भाजपच्यावतीने विमानतळ अधिकारी किरण कुमार यांची भेट घेण्यात आली यावेळी विमानतळ अधिकारी किरण कुमार यांनी सांगितले की, या ठिकाणी जास्तीत जास्त स्थानिकांना नोकर भरतीत प्राधान्य दिले जाईल.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांच्या सूचनेवरून कुडाळ तालुका भाजपच्या वतीने सिंधुदुर्ग विमानतळाचे अधिकारी किरण कुमार यांची भेट घेण्यात आले यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष विनायक राणे व दादा साईल यांनी सांगितले की नोकर भरती मध्ये स्थानिकांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे तसे न झाल्यास आम्ही पुढील पाऊल उचलू असे सांगितले यावेळी विमानतळ अधिकारी किरण कुमार यांनी सांगितले की जे युवक तांत्रिक शिक्षण घेतलेले आहेत त्यांना त्या पद्धतीने नोकरीमध्ये सामावून घेतले जाईल आणि ज्यांनी तांत्रिक शिक्षण घेतलेले नाही त्यांना सुद्धा इतर ठिकाणी नोकर भरती सामावून घेतले जाईल याठिकाणी स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले यावेळी मंडल सरचिटणीस देवेन सामंत, योगेश घाडी, विनोद सावंत, प्रितेश गुरव, प्रदीप जाधव, शुभम राणे व जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा