You are currently viewing द हॅपी फिट शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

द हॅपी फिट शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

*द हॅपी फिट शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न*

प्राधिकरण-(प्रतिनिधी)

यमुना नगर मधील दि हॅपी फीट प्री स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन प्रसिद्ध ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या परिसरात असलेल्या मनोहर वाढोकर या शहरातील एका उत्तम सभागृहात पार पडले.


छोट्या मुली, मुलांनी आपली कला साभिनय सादर केली .एकूण 44 मुली, मुलांनी सहभाग घेतला.
संस्थेला यावर्षी पाच वर्षे पूर्ण झाली. 170 हून अधिक मुले पास होऊन पुढील शिक्षणासाठी मोठ्या शाळांमध्ये गेली.
वर्षभरात शाळेत स्पोर्ट्स डे ,ग्रँड पेरेंट्स डे ,फॅन्सी ड्रेस, फन फेअर ,ॲन्यूअल गॅदरिंग, कलर डेज फील्ड विजिट, पिकनिक आणि सर्व सण उत्साहाने साजरे केले जातात.
स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन अंकिता वारियर यांनी कुशलतेने केले .


मुलांच्या नृत्याचे संचलन विराट व अमृता वाईरकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम संचालिका मुख्याध्यापिका सौ पूजा शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला .शाळेच्या शिक्षिका आबा जोशी दिपाली मोरे रोहिणी भालेराव श्रीदेवी दीदी व अश्विनी वांगणे दीदी यांच्या विशेष कौतुक पालकांनी केले
आलाप संगीत विद्यालय आणि कलांगण कथ्थक क्लास यांच्या चालक अश्विनी तळेगावकर व सौ प्रज्ञा शिंदे यांच्या विद्यार्थिनींनी सुद्धा आपली कला सादर केली.
सर्व पालकांनी, आजी,आजोबांनी मुलांचे कौतुक करत हिरीहरीने सहभाग घेऊन मुलांचे मनोधैर्य वाढविले व कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 17 =