You are currently viewing चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला NCB कडून अटक…

चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला NCB कडून अटक…

मुंबई :

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीने चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला अटक केली आहे. मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर बनखेडे यांनी ही माहिती दिली.

 

बॉलिवूडमध्ये पसरलेल्या ड्रग्जचं जाळं आज चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्यापर्यंत पोहचलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिरोज नाडियाडवाला यांच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आली आहेत. लवकरच एनसीबी चौकशीसाठी फिरोजला समन्स पाठवेल, अशी दाट शक्यता आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजच्या घरी एनसीबीच्या सर्च ऑपरेशनमध्ये १० ग्रॅम गांजा, तीन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर बनखेडे यांच्या नेतृत्वात एनसीबी मुंबईच्या पथकाने काल मुंबईतील पाच ठिकाणी छापा टाकला.

 

हा रेड ड्रग्ज पॅडलर्स आणि सप्लायरची धरपकड करण्यासाठी टाकली आहे. यात सुमारे ४ ते ५ ड्रग पॅडलर्स सप्लायर्सला ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलं असून त्यात गांजा चरससह आणखी एक औषध जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर रोकडसह वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =