You are currently viewing ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा वजराट येथे छानदार शुभारंभ

‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा वजराट येथे छानदार शुभारंभ

वजराट (ता.वेंगुर्ला) :

 

वेंगुर्ले तालुक्यातील वजराट या गावात ‘स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव आझादी कार्यक्रम’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय.

जिल्हा परिषदेच्या पूर्ण प्राथमिक प्रशालेत विविध उपक्रमांनी शुभारंभ करण्यात आला. गावातील महिला वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग होता.

 

वजराट गावचे सरपंच महेश मनोहर राणे, उपसरपंच नितीन यशवंत राणे, ग्रा. प. सदस्य प्रेमानंद भोसले, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत परब, पर्यवेक्षकीय अधिकारी अशोक सोनवडेकर, ग्रामसेवक प्रविण भोई, शाळेचे मुख्याध्यापक संजय परब, वजराट प्रशाळेचे उपशिक्षक बांदिवडेकर, माजी सैनिक सुभाष परब, ग्रामपंचायत कर्मचारी रवींद्र मोरे, सौ. पूर्वा कांदे, प्रविण गावडे, आरोग्य सेविका सौ. धर्णे, प्रमुख गावकर सूर्यकांत परब, ग्रामस्थ वसंत परब, मंगेश परब उपस्थित होते.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा