You are currently viewing डंपर आंदोलन प्रकरणी आ. नितेश राणे यांच्यासह ४१ जणांची निर्दोष मुक्तता

डंपर आंदोलन प्रकरणी आ. नितेश राणे यांच्यासह ४१ जणांची निर्दोष मुक्तता

सिंधुदुर्गनगरी

४ मार्च २०१६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या गेटवर झालेल्या डंपर आंदोलन प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह ४१ जणांची जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी रोटे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.

डंपर व्यावसायिकांच्या प्रश्नांची प्रशासन दखल घेत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आंदोलन केले होते. यावेळी मोठा राडाझाला होता. त्यानंतर या सर्वांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक केली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. याबाबत येथील न्यायालयात खटला चालला. याकामी २० साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. यामध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक तत्कालीन जिल्हाधिकारी यांचीही साक्ष नोंदवण्यात आली होती. आंदोलनातील आंदोलनकर्ते आमदार नितेश राणे, सतीश सावंत, दत्ता सामंत, संग्राम प्रभुगावकर, संतोष कोदे, नझीर शेख, राधाकृष्ण पावसकर, अनिल नाईक, राजेश सावंत, दुर्गाप्रसाद स्वामी, योगेश राऊळ, शोएब शेख, अनंत मेस्त्री, स्वप्निल मिठबावकर, प्रदीप मांजरेकर, संतोष धुरी, महेश म्हाडळकर, रमेश वांयंगणकर, संजय पालव, चंदन कांबळी, अक्षय सावंत, मिलिंद मेस्त्री, राकेश म्हाडदळकर, रुपेश जाधव, मुकुंद परब, एकनाथ नाडकर्णी, संतोष नालंग, सिद्धेश परब, पंढरीनाथ हडकर, महेंद्र सांगेलकर, संतोष चव्हाण, हनुमंत बोंद्रे, आना भोगले, यशवंत सावंत, सुनील सावंत, सुशांत पांगम, अनिल कांदळकर, शिवा परब, संतोष राऊत, दीपक खरात या 41 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या सर्वांच्या वतीने अँड. संग्राम देसाई, अँड राजेंद्र रावराणे, अँड अमोल सामंत डींगे यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा