You are currently viewing सुगंधा केदार गुरव यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवणचा ‘आदर्श कथामाला कार्यकर्ता पुरस्कार’ प्रदान

सुगंधा केदार गुरव यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवणचा ‘आदर्श कथामाला कार्यकर्ता पुरस्कार’ प्रदान

मालवण :

सुगंधा केदार गुरव केंद्रप्रमुख केंद्रशाळा आचरे नं १ तसेच सचिव अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण यांना पूज्य साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त *आदर्श कथामाला कार्यकर्ता* पुरस्कार ‘मांगल्य मंगल कार्यालय’ येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

माननीय संजय माने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मालवण, माननीय रामचंद्र आंगणे स्वीय सहाय्यक शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य आणि माननीय सुरेश ठाकूर अध्यक्ष अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र आणि ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरूप होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मंदार सांबारी,’चेअरमन श्रीदेव रामेश्वर वैभवशाली पतसंस्था आचरे’. हे होते. तर प्रमुख अतिथी श्रीम. उज्वला धानजी बँक ऑफ महाराष्ट्र कणकवली, श्री निलेश सरजोशी आचरे, श्री.द. शि.हिर्लेकर गुरुजी, श्री. अशोक कांबळी, श्री. जयप्रकाश परुळेकर, श्री विठ्ठल कदम,प्रशांत पारकर आदी उपस्थित होते.

प्रारंभी सुरेश ठाकूर यांनी, सुगंधा गुरव यांच्या कथामालेच्या एकनिष्ठ कार्याचा गौरव केला. श्री. संजय माने म्हणाले, श्रीम. सुगंधा गुरव यांचा कथामाले मार्फत जो सत्कार झाला त्याचा शिक्षण विभागाचा तालुक्याचा प्रमुख म्हणून मला अभिमान आहे. आपले शैक्षणिक काम आणि सामाजिक कार्य त्यांनी अत्यंत सेवाभावीपणे केलेले आहे. याचाही मला अभिमान आहे. श्री रामचंद्र आंगणे यांनी श्रीम. सुगंधा गुरव यांच्या शैक्षणिक आणि कथामालेच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना सेवानिवृत्तीपूर्व शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना श्रीम सुगंधा गुरव यांनी आपले विचार मांडताना म्हणाल्या , मी विद्यार्थी दशेपासून शिक्षक होईपर्यंत आणि आता ११ वर्षे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असेपर्यंत कथामालेशी एकनिष्ठ राहिले. आदरणीय ठाकूर गुरुजींचे मार्गदर्शन मला केवळ कथामालेपुरतेच नाही तर माझ्या अखंड सेवेमध्ये लाभले. म्हणूनच मी शैक्षणिक आणि कौटुंबिक जीवनात यशस्वी कार्य करू शकले.

या कार्यक्रमासाठी श्री सदानंद कांबळी, प्रकाश पेडणेकर, माधव गावकर व निलाक्षी गावकर ,सुरेंद्र सकपाळ,श्रीम वैजयंती करंदीकर तसेच तात्या भिसळे, लक्ष्मण आचरेकर, सुरेश गावकर, रवींद्र मुणगेकर, मनाली फाटक, श्रुती गोगटे, उज्वला महाजन, पांडुरंग कोचरेकर, रश्मी आंगणे, रामचंद्र कुबल व साक्षी कुबल, विजय व विशाखा चौकेकर, अमृता मांजरेकर, संजय व सायली परब, परशुराम गुरव, कामिनी ढेकणे, चंद्रकांत माने, अरुण आडे, रामकृष्ण रेवडेकर, भावना मुणगेकर, नवनाथ व स्वाती भोळे गुरुनाथ व तेजल ताम्हणकर,नितिन व श्रावणी प्रभू, मृणालिनी आचरेकर, प्रतिभा मयेकर आणि बहुसंख्य कथामाला कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि यांनी आभार प्रदर्शन श्री नवनाथ भोळे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा