You are currently viewing आदर्श आचारसंहितेचे पालन करावे – जिल्हाधिकारी किशोर तावडे

आदर्श आचारसंहितेचे पालन करावे – जिल्हाधिकारी किशोर तावडे

आदर्श आचारसंहितेचे पालन करावे – जिल्हाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दि. 7 मे 2024 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार, तसेच मतदानाच्या पुर्वी 48 तास अगोदर प्रचार बंद करणे अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या दृष्टीने उमेदवार, राजकिय पक्ष, अन्य कोणीही व्यक्ती यांना मतदानाच्या पुर्वी 48 तासापासून ते मतदान संपेपर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही, आदर्श आचारसंहितेचा भंग होईल असे कोणतेही कृत्यही करता येणार नसल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आदेशित केले आहे.

            लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 126 ने प्राप्त अधिकाराचा वापर करुन संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदान केंद्रे व परिसरात खालील कृत्य करण्यास या आदेशान्वये मनाई करत आहे.

            कोणतेही व्यक्ती कोणत्याही मतदान क्षेत्रात, त्यास मतदान क्षेत्रातील कोणत्याही निवडणुकीतील मतदान पूर्ण करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेपर्यंत पूर्ण होणाऱ्या 48 तासाच्या कालावधी.

            निवडणूकीच्या संबंधात कोणतीही जाहिर सभा किंवा मिरवणूक बोलावणार नाही, भरणार नाही, त्यास उपस्थित राहणार नाही, त्यास सहभागी होणार नाही किंवा त्यास उद्देशून अभिभाषण करणार नाही किंवा जनतेला चलचित्राच्या, दुरचित्रवाणीच्या किंवा अन्य तत्सम साधनांच्या सहाय्याने निवडणूक विषयक कोणतीही बाब प्रदर्शित करणार नाही. किंवा जनतेचे लक्ष आकर्षून घेण्यासाठी कोणतेही संगीत सभा किंवा अन्य नाट्य प्रयोग किंवा कोणताही करमणूकीचा व मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करुन किंवा आयोजित करण्याची व्यवस्था करुन निवडणूक विषयक कोणत्याही बाबीचा प्रचार करणार नाही.

              जी व्यक्ती  वरीलप्रमाणे उपबंधाचे व्यक्ती क्रमण करील ती व्यक्ती 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा द्रव्य दंडास किंवा दोन्ही शिक्षास पात्र असेल, याची नोंद घ्यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा