You are currently viewing ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश मधील रत्नागिरी, रायगड(ग्रामीण), पालघर जिल्हाध्यक्षांच्या व नवी मुंबई विभागीय अध्यक्षांच्या निवडी जाहीर.

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश मधील रत्नागिरी, रायगड(ग्रामीण), पालघर जिल्हाध्यक्षांच्या व नवी मुंबई विभागीय अध्यक्षांच्या निवडी जाहीर.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी काकडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी केल्या निवडी जाहीर

कोकण प्रदेश

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण जी काकडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश मधील जिल्हाध्यक्षांच्या व विभागीय अध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या.या निवडी मध्ये
रत्नागिरी जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी प्रसाद कोकरे, रायगड ग्रामीण जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी शिवाजी हिरवे, पालघर जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी रामदास शेळके तर नवी मुंबई विभागीय अध्यक्षपदी संजय सातपुते यांची निवड करण्यात आली.
महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी या निवड करताना निवड पत्रात असे म्हटले आहे की,धनगर समाजाच्या हिताचे संवर्धन करण्यासाठी आपण समाजात एकनिष्ठेने काम करत आहात. आपण करत असलेल्या या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
धनगर समाजाचे संवर्धन आणि समाज हिताचे रक्षण व्हावे या हेतूने राष्ट्रीय पातळीवर पोटशाखा भेद, प्रांतभेद, भाषाभेद बाजूला ठेवून सर्व धनगर समाज एक होत आहे. आपल्या कार्याची दखल घेत या राष्ट्रीय प्रवाहात आपणास सहभागी करून घेऊन आपल्या आजपर्यंतच्या समाजसेवेचा यथोचित गौरव करावा व आपणास आणखी विस्तारित कार्यक्षेत्र उपलब्ध व्हावे, या हेतूने आपली ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश युवक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी व विभागिय अध्यक्ष पदी निवड करीत आहोत. सदरील पदाचा कार्यकाल हा एक वर्षाचा राहील.
सदरील पदावर उत्कृष्ट काम करून महासंघाने व समाजाने आपल्यावर टाकलेल्या विश्वासास आणि आदरास तडा जाऊ देणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करत कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या. तर याआधी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी अमोल जंगले रायगड शहर जिल्हा अध्यक्ष पदी विश्वास नांगरे तर ठाणे जिल्हाध्यक्षपदी संदीप माने हे यशस्वीरित्या जिल्हा अध्यक्ष पदावर काम पाहत आहेत. या सर्व नवीन निवडीमुळे कोकण प्रदेश मधील ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे हात मजबूत होणार असून समाज बांधवांना न्याय देण्यासाठी हा महासंघ काम करेल असा विश्वास कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा