You are currently viewing न्हावेली-रेवटेवाडी येथील एक एकर काजू बागायती शॉर्टसर्किटमुळे जळून खाक…

न्हावेली-रेवटेवाडी येथील एक एकर काजू बागायती शॉर्टसर्किटमुळे जळून खाक…

सावंतवाडी 

न्हावेली-रेवटेवाडी येथील काजू बागेत विद्युत वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट होऊन सुमारे एक एकर वरील काजू बागेला आग लागली. ग्रामस्थांनी वेळीच धाव घेतल्यामुळे मोठी आर्थिक हानी टळली. वीज प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही विद्युत खांब व जीर्णवाहिन्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्यामुळेच असा प्रकार घडल्याचा आरोप काजू बागायतदार प्रसाद हळदणकर यांनी केला.
रेवटेवाडी येथील शशिकांत हळदणकर यांच्या काजू बागेस दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. धुराचे लोट लांबून दिसल्यामुळे ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदर परिसरात विद्युत खांब व जीर्ण वाहिन्या वीज वितरणच्या निदर्शनास आणूनही दुर्लक्ष झाला. त्यामुळेच आपल्या बागायतीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात सुमारे वीस ते पंचवीस झाडे जळाली असून 50 हजारांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने आमचे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी व झालेली नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काजू बागायतदार शेतकरी प्रसाद हळदणकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा