रावण वध

रावण वध

रावण वध

कितीवेळा रावण जाळणार,
एकाच गुन्ह्यासाठी…
रस्तोरस्ती भटकताना राक्षस,
भटक्या कुत्र्यांसारखे.
चिरडतात, चिरफाड करतात.
अंगाचे लचके तोडतात..
सवकलेल्या लांडग्यांसारखे.
तरीही,
कितीवेळा रावण जाळणार,
एकाच गुन्ह्यासाठी..

वकवकलेल्या नजरा,
कपड्यांच्या आत घुसतात.
सावसुद्धापणाचा आव आणून,
नजरेने बलात्कार करतात.
ओरखडे येत नाहीत पण,
माना झुकवतात शरमल्यासारखे.
तरीही,
कितीवेळा रावण जाळणार,
एकाच गुन्ह्यासाठी..

एकटी दुकटी पाहून,
इशारे करतात, खुणावतात.
निर्लज्जपणे शिट्या वाजवतात,
अंगावर हातही टाकतात,
अगदी बिनधास्तपणे..स्वतःला
आयाबहिणी नसल्यासारखे.
तरीही,
कितीवेळा रावण जाळणार,
एकाच गुन्ह्यासाठी..

दिवसाढवळ्या.. रात्री बेरात्री,
शरीर मन सर्वच लुटतात,
जीभ छाटतात, हातपाय तोडतात.
पैशांच्या जोरावर क्षणार्धात,
पुरावेही जळून खाक होतात..
आरोपीही निर्दोष सुटतात..
काहीच न झाल्यासारखे…
तरीही,,,,,आपण मात्र..
कितीवेळा रावण जाळणार..
एकाच गुन्ह्यासाठी…??

(दीपी)

This Post Has One Comment

  1. शाहरुख नाईकवाडी

    जो पर्यंत अशा गुन्ह्या बद्दल कडकडीत कायदे येत नाही तो पर्यंत असले पिसाललेले कुत्र्याचं काही करता येणार नाही, आणि जर सामान्य माणसाने कायदा हातात घेतला तर सगळे कुत्र्यासारखे अंगावर धावून येतील. म्हणून आता पासून मुलींनी सरकार वर अवलंबून न राहता आपल्या जवळ आपल्या सुरक्षिततेसाठी कुठचेही हत्यार बाळगायला हरकत नाही, आणि आपल्या सुरक्षिततेसाठी त्या हारामखोरांना जे असले नको ते कृत्य करतात, त्यांना देवाघरी पाठवण्यास हरकत नाही….

प्रतिक्रिया व्यक्त करा