You are currently viewing प्रित

प्रित

प्रित

कसे गोडवे गाऊ तुझे, हे गीत अधुरे राहील तर.
तुझ्या भेटीची आस मनी, ही प्रित अधुरी राहील तर.

कसा तुझा हात सोडू, ही साथ सुटून जाईल तर.
हृदयी रहायचे वचन तुझे, विस्मृतीत तुझ्या जाईल तर.

कसा विचारू मी प्रश्न मनास, मन अबोला धरुनी राहील तर.
भास आभास होतंच राहती, ती नजरेतच कैद राहील तर.

कशा मांडू व्यथा मनीच्या, मन तुझ्यात गुंतून राहील तर.
नित्याचेच झाले दुःख लपविणे, मन सुखंच शोधत राहील तर.

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + nineteen =