*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पाहून आपला पोरखेळ*
उगाच केलीस जायची घाई
वाऱ्या आधी विझली ज्योत
परत फिरलो कष्टी होऊन
बळ न उरले *पायात*
//1//
कसे काय ग तुझे बिनसले
ध्यानी न माझ्या आले कधी
पाट न मांडला *जेवायला*
नकार दिलास भोजनाआधी
//2//
लागत नवतो *देणे घेणे*
कधी न ओलांडली मर्यादा
जपत होतो इच्छा आकांक्षा
नाही वागलो मी बाकायदा
//3//
नकाराची वाजवून घंटा
निघून आलीस ढगामधी
पिऊन सारा सागर खारा
बदनाम झालो विश्वामधी
//4//
होते तारे सदा साक्षीला
पहात आपला आगम्य खेळ
चक्रावून गेले तेही आज
*पाहून आपला पोरखेळ*
//5//
विनायक जोशी 🖋️ठाणे
0510/9324324157
