*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शेतकरी बाप (कृषी दिनानिमित्त)*
शेतकरी बाप माझा
बारे देतो वावरात
हिरव्यागार रानातलं
स्वप्न पाहतो मनात
झाडावरचं पाखरू
टपलयं कणसावरी
ज्वारी जोंधळ्याची ताट
डुलतयं वाऱ्यावरी
हिरवी मिरची कोथंबीरी
कोबी, तोंडली, गवारी
आलं पिक सोन्यावानी
बा ची भरली पंढरी
कांदा, द्राक्षाच्या पिकाचं
पिक आलयां जोमानं
माझ्या बापाच्या वावरी
भरलं कुबेराचं धन
भक्त भोळा विठोबाचा
रान पाखरे त्याच्या संग
पाटाच्या पाण्यात गाई
नामा, तुक्याचा अभंग
शेतकरी बा माझा
जाई कार्तिकी वारीला
वारी कधी ना चुकली
पंढरीच्या विठोबाला
*शीला पाटील. चांदवड.*
_________________________
*संवाद मीडिया*
*🚘 तुमच्या कुटुंबासाठी स्मार्ट आणि सुरक्षित निवड — Hyundai Exter!*
*✨ स्टाईल, सेफ्टी आणि शानदार मायलेजचा परफेक्ट संगम! ✨*
*Exter ला खास बनवणारी ५ दमदार वैशिष्ट्ये 👇*
*✅ परवडणारी किंमत*
*💰 फक्त ₹5.80 लाखांपासून*
*✅ जबर्दस्त CNG मायलेज*
*⛽ 27.1 किमी/कि.ग्रॅ. पर्यंत मायलेज*
*✅ स्मूथ आणि पॉवरफुल परफॉर्मन्स*
*⚙️ 4 सिलेंडर CNG इंजिनसह दमदार ड्रायव्हिंग अनुभव*
*✅ उच्च दर्जाची सुरक्षा*
*🛡️ 6 एअरबॅग्जसह 30+ स्टँडर्ड आणि 45+ आधुनिक सेफ्टी फीचर्स*
*✅ जास्त लगेज स्पेस*
*🧳 ड्युअल सिलेंडर CNG असूनही भरपूर बूट स्पेस*
*🎁 आजच टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा!*
*🚗 Hyundai Motor Company अधिकृत विक्रेता*
*MAI Hyundai — अविरत सेवेची 27 वर्षे*
*📍 कुडाळ: उद्यमनगर, मुंबई-गोवा हायवे*
*📍 कणकवली: वृक्षवल्ली नर्सरी कंपाउंड, वागदे*
*📞 संपर्क : 74100 06037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/203812/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
