*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तरुवरती तो एकला…*
तरूवरी तो एकला धरून धीर
परी दिसे तो नयनास पैलतीर
सगे सारे सोबती ही दूर गेले
सोबतीस ते काटेच फक्त ठेले..
पडून पिवळा देहही झाला जीर्ण
धीर धरूनी तरीही खेळे पर्ण..
लाही लाही संपेल दिसात काही
खुणा जरी त्या पर्जन्य दिसत नाही
उपयोग पण मज काय आता त्याचा
देह पडूनी मातीत आता साचा
तरूवरीत्या नाचलो खेळलो मी
जीवनाची परी नसे आता हामी
आलो गेलो नाहीच खंत त्याची
रीत आहे माहित ती सृष्टीची
मिळूनी मी मातीत होई एक
तरूवरती फुलतील पहा अनेक…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
