जागतिक जल दिवस – पाणी

जागतिक जल दिवस – पाणी

थेंब थेंब पाण्याचा,
साचून बनतो पाट..
सुख दुःखांना डोळ्यातून,
मोकळी करून देतो वाट.

थेंब थेंब सांडूनी भूवरी,
भूमीचा होऊनी जातो.
पाण्यासाठी बळीराजा,
आभाळी डोळे लावूनी बसतो.

थेंब थेंब साचे पाणी,
नदी, नाले, तलाव भरती.
महापुराची भीती उरी,
जलधारा बेभान कोसळती.

थेंब थेंब जल अमृत,
भटकटी त्यांनाच माहीत.
कष्टकरी व्याकूळ तृष्णेन,
किंमत जलाची त्यांस ज्ञात.

कोप निसर्गाचा होता,
जल विशाल रूप धारी.
पाप पुण्य एकाच ठायी,
जल समूळ ते संहारी.

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा