You are currently viewing लज्जा

लज्जा

कवितांजली, सदाबहार काव्यांजली ग्रुप च्या सदस्या लेखिका कवयित्री सौ.स्वाती गोखले यांची अप्रतिम काव्यरचना

लाडिक लाजण्याचा बघ तुझाच हा मान !
लाजणे मुरडणे जणू तुझीच की ग शान !

किती गोड लाजतेस ग तू !
फळाची फोड जणू दिसतेस तू !

गोड गोजिरी आहे तुझी मोहक काया
जणू मंजिरी तू त्या तुळशीची छाया

निळे सुंदर डोळे तुझे सौंदर्याचा आरसा
भरदार कुंतल काळे पाहूनी लाजतो तोही अस्सा !

कमनीय तुझे लावण्य पाहूनी जातो हरखून
फुलांनीही हसून पाहावे तुझ्याकडे ग निरखून !

गो-या गुलाबी गालावर तुझ्या दिसते नाजूक खळी
नजरेनेही नजर देताना द्यावी मोहक कोपरखळी

हनुवटीवर शोभतसे तुझ्या सुंदर काळा तीळ
पाहूनी वेडावतसे तुला मारतो एखादा शीळ

प्राजक्ताचा गंध येतसे तुझ्या देहाच्या पातीस
लावण्यही लाजतसे पाहूनी तुझ्या गो-या कांतीस !!

सौ.स्वाती गोखले.
पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा