*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मोक्षप्रहर*
***********
सांज दाटल्या अस्ताचली
भावनांचा कल्लोळ आहे
झाकोळलेल्या निलांबरी
सावळ्याची सावली आहे…..
मनी गुंजारव भावभक्तीचा
आत्मा तुझ्यात मग्न आहे
ब्रह्मांडी सत्य केवळी तूच
अंतरंगी तुझाच भास आहे…..
वैखरीवरीचे तुझेच पाझरणे
अलौकिक साक्षात्कार आहे
मनभावसागरी तुझीच गाज
नीरवतेतील मोक्ष प्रहर आहे…..
निमिष एक पुरेसाच रे आता
तुझ्या स्मरणात तृप्तता आहे
अरुपातील तुझे रूप आगळे
दिव्यत्वाचीच अनुभूती आहे…..
*************************
*©️ वि.ग. सातपुते. ( भावकवी )*
*📞 ( 9766544908 )*