खंडाने शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या….

खंडाने शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या….

घे भरारी फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजप पदाधिकारी सौ. मोहिनी मडंगावकर यांची तहसीलदारांकडे मागणी

सावंतवाडी

तालुक्यात खंडाने शेती करणाऱ्याना सातबाऱ्यावर त्यांचे नाव नसल्याने शासनाच्या नियमानुसार भात नुकसान भरपाई मिळत नाही आहे. परतीच्या पावसाने त्यांच्या भातशेतीचे नुकसान तर दुसरीकडे त्यांना खंड देखील द्यावा लागणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या समोर जीवन मृत्यूचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तरी या शेतकऱ्यांना काही नियम शिथिल करून जमीन मालकाला नुकसान भरपाई न देता जमीन कसणाऱ्या अर्थात खंडाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यास मिळावी अशी मागणी घे भरारी फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजप पदाधिकारी सावंतवाडी सौ. मोहिनी मडंगावकर यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अदिती नाईक उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा