You are currently viewing गवा रेड्याचा हल्ल्यात चौकुळ येथील शेतकरी ठार…

गवा रेड्याचा हल्ल्यात चौकुळ येथील शेतकरी ठार…

आंबोली

गवारेड्याने हल्ला केल्यामुळे चौकुळ-केगदवाडी येथील ७० वर्षीय शेतकरी जागीच ठार झाले. सोनू साबा परब, असे त्यांचे नाव आहे. काल रात्री उशिरा हा प्रकार उघड झाला. परिसरातील जंगलात त्यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
घटनेची अधिक माहिती अशी की,….चौकुळ-केगदवाडी येथे राहणारे परब हे शेतीच्या कामानिमित्त सकाळी दहा वाजता जंगलाच्या दिशेने गेले होते. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी परतले नाही. त्यामुळे घरातील सदस्यांनी व मित्र मंडळींनी शोधाशोध केली. यावेळी काल रात्री उशिरा वस्तीलगत असलेल्या जंगलमय परिसरात त्यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. यावेळी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान त्यांच्या अंगावरील वार लक्षात घेता ते गवारेडेच्या शिंगाचे असल्याचे लक्षात आले. तर गव्याने हल्ला केल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + seventeen =