You are currently viewing लोकहिताची कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार – शैलेश लाड

लोकहिताची कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार – शैलेश लाड

“राष्ट्रवादी आपल्या दारी” कार्यक्रम सावंतवाडीत राबवणार…

बांदा

राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकांसाठी काम करणारा पक्ष असल्याने युवा पिढी मोठ्या संख्येने पक्षाकडे आकर्षित होत आहे. युवकांच्या माध्यमातून भविष्यात गावागावात पक्ष बळकट करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शासनाची लोकहिताची कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लवकरच ‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सावंतवाडी युवक विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड यांनी दिली.
लाड म्हणाले की, राष्ट्रवादी हा प्रमुख सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे गावागावात जनता दरबारच्या माध्यमातून स्थानिकांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी संबंधित विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांना देखील जनता दरबारात बोलावून स्थानिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना आहेत. मात्र याची माहिती स्थानिक पातळीवर नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, लोक शासनाच्या लाभापासून वंचित आहेत. यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यात येतील.
स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी काय प्रयत्न करता येतील याबाबत देखील आम्ही नियोजन केले आहे. स्थानिक कोकणी मेव्याला मेट्रो शहरांमध्ये बाजारपेठ मिळावी यासाठी आम्ही लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे लाड यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा