You are currently viewing आ. नितेश राणे 4 जूनला वैभववाडीत; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरपंच यांच्यासोबत बैठकीचे आयोजन

आ. नितेश राणे 4 जूनला वैभववाडीत; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरपंच यांच्यासोबत बैठकीचे आयोजन

सरपंच व लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे : नासीर काझी यांचे आवाहन

वैभववाडी
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील सरपंच व लोकप्रतिनिधी यांची बैठक शुक्रवार दि. 4 जून रोजी दु. 12 वा. येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच गावात अलगीकरण कक्ष तयार करत असताना गाव पातळीवर येणाऱ्या अडचणी आ. नितेश राणे हे सरपंच यांच्याकडून जाणून घेणार आहेत. तसेच या समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन व चर्चा करण्यात येणार आहे. तरी या बैठकीला तालुक्यातील सर्वपक्षीय सरपंच तसेच लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा