You are currently viewing कांदा

कांदा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी यश सोनार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*कांदा*

उन्ह वा-याचे आम्ही
सोसले आहे घाव
आता तरी कांद्याला
मिळेल का रे भाव

व्यापा-याला परवडतो
खाणा-याला परवडतो
मग भावाचं समीकरण
सांगा कोण बिघडवतो

नुसत्या घोषणा नको
मिळावा तो हमीभाव
अन्यथा पुन्हा एकदा
हे सरकार बदला राव

कांदा कधी रडवतो
कांदा कधी फसवतो
तरीही शेतकऱ्याला
कांदा आधार असतो

देवा तु तरी आता ह्या
बळीच्या मदतीला धाव
भाव पडला म्हणून हा
व्यापारीच मारतो ताव

कवी यश सोनार ठेंगोडा
मो 8856835211

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − six =