You are currently viewing स्वछतेचे पुजारी संत गाडगे बाबा

स्वछतेचे पुजारी संत गाडगे बाबा

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समाजाच्या सदस्य लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*

*स्वछतेचे पुजारी संत गाडगे बाबा*

स्वच्छतेचे पुजारी
संत गाडगे महाराज
जयंती आज
बाबांची

आपल्या कीर्तनातून
देती स्वच्छतेचा मंत्र
वेगळेच तंत्र
सुधारकाचे

अवस्था पाहून
अशिक्षित भोळ्या समाजाची
मोहीम जनजागृतीची
धडाक्यात

मोडून काढती
समाजातील अनिष्ठ रूढी
घडविली पिढी
नवविचारांची

हाती खराटा
गाव स्वच्छ करण्यासाठी
हातात पाटी
निरक्षरांच्या

उपेक्षितांची सेवा
हीच देवाची भक्ती
मिळतसे शक्ति
कीर्तनात

 

प्रतिभा पिटके
अमरावती

 

प्रतिक्रिया व्यक्त करा