You are currently viewing राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी ९ मार्चपर्यंत अर्ज करा

राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी ९ मार्चपर्यंत अर्ज करा

राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी ९ मार्चपर्यंत अर्ज करा

सिंधुदुर्गनगरी 

भारत सरकार युवा कार्य क्रीडा मंत्रालयतर्फे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक (National Youth Volunteers) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील युवक व युवतीनी www.nyks.nic.in या वेबसाईटवर ऑनलाईन व नेहरु युवा केंद्र ओरोस येथे ऑफलाईन अर्ज ९ मार्च २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे  जिल्हा युवा समन्वयक  यांनी केले आहे.

            या पदासाठी शिक्षण कमीत कमी १० वी पास व वयोमर्यादा दिनांक ०१/०४/२०२३ रोजी १८ पेक्षा जास्त व २९ पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्जदार नियमित विद्यार्थी किंवा नोकरी कामगार असू नये. राष्ट्रीय युवा स्वयंसेवक मानधन दर महा रु.५०००/-आहे. स्वयंसेवक हा त्याच तालुक्यातील रहिवाशी असावा. पगाराची नोकरी नाही किंवा स्वयंसेवक कायदेशीररित्या सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या रोजगाराचा दावा करण्यास पात्र नसेल.

      अधिक माहिती व अर्ज www.nyks.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सदर करण्याची अंतिम तारीख ९ मार्च २०२३ असेल अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग येथे कार्यालयीन वेळेमध्ये (सकाळी १० ते सायं ५) दूनध्वनी क्रमांक02362-295012 वर संपर्क साधावा.

            जिल्ह्यामध्ये युवकाचे नेटवर्क तयार करणे, भारत सरकारच्या विविध योजनामध्ये सहभाग घेणे, युवकांना राष्ट्र निर्माण कार्यामध्ये योगदान देण्याची संधी भारत सरकारद्वारा युवकांच्या नेतृत्व गुणांची क्षमता व त्यांची उर्जा स्वयंसेवेच्या माध्यमातून राष्ट्र निर्माण कार्यामध्ये वापर करणे, त्याचप्रमाणे साक्षरता, स्वच्छता, आरोग्य, लिंगभेद, सामाजिक समस्याबाबत जनजागृती अभियान राबविणे. त्या करिता युवकांना संगठीत करणे, युवक महिला मंडळे यांच्याशी संपर्क वाढविणे, शासकीय विभागाच्या सहकार्याने विविध कार्यक्रम राबविणे तसेच सहकार्य करणे या करिता प्रत्येक तालुक्यामध्ये दोन व कार्यालायामध्ये संगणक विभागामध्ये काम करण्याकरिता दोन स्वयंसेवक अशा युवक युवतींची निवड करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा