You are currently viewing आशिये वरचीवाडी येथील संदीप उर्फ संजय बागवे यांचे दुःखद निधन

आशिये वरचीवाडी येथील संदीप उर्फ संजय बागवे यांचे दुःखद निधन

*आशिये वरचीवाडी येथील संदीप उर्फ संजय बागवे यांचे दुःखद निधन*

कणकवली

कणकवली तालुक्यातील आशिये वरचीवाडी येथील रहिवाशी श्री. संदीप उर्फ संजय बाळकृष्ण बागवे (वय ४७) यांचे आज गुरुवार दि. २३ मे २०२४ रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. प्रसिद्ध लाकूड व्यवसायिक म्हणून त्यांची ओळख होती. लिंगमाऊली प्रासादिक भजन मंडळाचे ते संस्थापक आणि उत्कृष्ट चकवा/ झांज वादक होते. प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारे, आजारी गुरांवर औषधोपचार करणारे, कणखर बाणा असलेले पहाडी व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, ५ वर्षाचा मुलगा, भाऊ, बहीण, पुतणे, पुतणी असा परिवार आहे.

आशिये गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्या विद्या बागवे यांचे ते पती होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा