You are currently viewing मध्य महाराष्ट्रात हुड हुडी वाढली…

मध्य महाराष्ट्रात हुड हुडी वाढली…

पुणे :

विदर्भ मराठवाड्यानंतर मध्य महाराष्ट्रात थंडी वाढू लागली आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली असून किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. सध्या राज्याच्या सर्वच भागात थंडीचा कडाका वाढला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी थंडी वाढणार आहे. तर निफाड येथे ८.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

राज्यात गुरूवारी मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ६ अंशाने खाली घसरला आहे. विदर्भात ११ ते १८ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात ११ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. दरम्यान, मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात चांगलीच घट झाली असून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीचे प्रमाण जास्त आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किमान तापमानात घसरण झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =