You are currently viewing माजगाव-मेटवाडा येथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी केलेले उपोषण तहसीलदारांचे आश्‍वासनानंतर स्थगित

माजगाव-मेटवाडा येथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी केलेले उपोषण तहसीलदारांचे आश्‍वासनानंतर स्थगित

सावंतवाडी

येथील माजगाव मेटवाडा परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्याधिकारी व जीवन प्राधिकरण ज्यांच्या उपस्थित येत्या मंगळवारी संयुक्त बैठक लावू, असे आश्वासन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी येथील तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण मागे घेतले. गेल्या ३ महिन्यापासून पालिकेने नळपाणी योजनेचा पुरवठा बंद केल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचे हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज गांधी जयंती दिवशी संबंधितांनी उपोषण सुरू केले होते. दरम्यान येत्या बैठकीत यावर तोडगा न निघाल्यास आम्ही संबंधित प्रशासनाच्या विरोधात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा उपस्थितांनी दिला आहे.
यावेळी पवन सावंत,प्रसाद सावंत,गोविंद माळकर,अभिजित सावंत, सौरभ पडते,लक्ष्‍मण परब, बाळासाहेब नंदीहळ्ळी, शार्दुल सावंत, रमाकांत राऊळ, नरेंद्र गद्रे,बापू तुळसकर, प्रतिक सावंत, रमाकांत राऊळ, बापू मालवणकर आदी उपस्थित होते.
माजगाव मेटवाडा परिसरात गेली अनेक वर्ष सावंतवाडी पालिकेकडून नळ पाणी योजनेचा पुरवठा सुरू होता. दरम्यान एक जुलैपासून हा पुरवठा अचानक बंद केल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना पाण्याविना हाल सोसावे लागत आहेत. याबाबत संबंधित प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधून सुद्धा त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही, असा आरोप करत ग्रामस्थांनी आज तहसील कार्यालयासमोर उपोषण छेडले.

यावेळी या उपोषणाला म्हात्रे यांनी भेट दिली. ते म्हणाले येत्या मंगळवारी आपण मुख्याधिकारी व जीवन प्राधिकरण यांची आपल्या कार्यालयात बैठक लावून यावर योग्य तो तोडगा काढू, तोपर्यंत आपण उपोषण स्थगित करावे, असे सांगितल्यानंतर उपस्थित उपोषणकर्त्यांनी माघार घेतली. मात्र या विशेष बैठकीनंतर तोडगा न निघाल्यास आम्ही संबंधित प्रशासनाच्या विरोधात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + seventeen =