You are currently viewing धनुष्यबाणा – तुझा वाद..!

धनुष्यबाणा – तुझा वाद..!

*डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर जळधनुष्यबाणा – तुझा वाद..!गाव समूहाचे सदस्य लेखक कवी बबनराव आराख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*धनुष्यबाणा – तुझा वाद..!*

 

इथे पेटलां वाद नवा…

दोघांना धनुष्य हवा..!

कोर्टात गेला दावा..

सत्याने न्याय व्हावा..!

 

धनुष्यबाणा…

तुझा इतिहास आहे जुना…

मारले तु , किती जनां…

तारले तु , किती जणां…

पाहीले जगाने , पुन्हा-पुन्हा…

 

धनुष्यबाणा…

तुला पाहिले रामाच्या खांद्यावरती…

रावणाच्या रथांवरती..!

 

धनुष्यबाणा…

तुला पाहीले , आम्ही पुन्हा…

कुरुक्षेत्राच्या धर्तीवरती…!

रक्ताचे पाट वाहिले…

हादरली सारी सृष्टी..!

 

धनुष्यबाणा…

केवढा वाद झाला….!

हंसाला जेंव्हा…

बाण लागलां …!

विचार तु – गौतम बुद्धां…

विचार तु -देवदत्ता..!

 

आणि… धनुष्यबाणा..!

आम्ही पाहीलां…वाद तुझां…

श्रीरामांत,त्या परषुरामात..!

जेव्हां तु मोडलां…

सितेच्या – स्वयंवरांत…!

 

बबन आराख.

गांगलगाव , बुलडाणा.

प्रतिक्रिया व्यक्त करा