You are currently viewing रामकृपाल नामदेव यांच्या चित्रांमधील मेलडी क्वीन लता मंगेशकर यांचे संस्मरणीय क्षण प्रथमच कोलकातामध्ये प्रदर्शित होणार

रामकृपाल नामदेव यांच्या चित्रांमधील मेलडी क्वीन लता मंगेशकर यांचे संस्मरणीय क्षण प्रथमच कोलकातामध्ये प्रदर्शित होणार

*रामकृपाल नामदेव यांच्या चित्रांमधील मेलडी क्वीन लता मंगेशकर यांचे संस्मरणीय क्षण प्रथमच कोलकातामध्ये प्रदर्शित होणार*

कोलकाता (गुरुदत्त वाकदेकर):

२२ फेब्रुवारी-२६ फेब्रुवारी, २०२३ दरम्यान जेमिनी रॉय आर्ट गॅलरी (ICCR) येथे प्रसिद्ध चित्रकार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड धारक रामकृपाल नामदेव यांचे “चित्रलतिका” ह्यांच्या एकल चित्र प्रदर्शनाचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे लता मंगेशकर. होय, लता मंगेशकर यांच्या संगीतातील तसेच वैयक्तिक क्षणांतील अनेक आठवणी रामकृपाल यांनी रंगवल्या आहेत. अशा सुमारे चाळीस विविध पेंटिंग्स सिटी ऑफ जॉय कोलकाता येथे प्रथमच प्रदर्शित केल्या जातील.

रामकृपाल यांचा कलेच्या क्षेत्रातील प्रवास लहानपणीच सुरू झाला. त्यांची आजी तिच्या घराचे अंगण शेण आणि पांढऱ्या चिकणमातीने (चुई) अतिशय सुंदर रंगवायची. आणि कधी-कधी ती दोन्ही भिंतींवर मातीची सुंदर कलाकृती करत असे. घराच्या दाराच्या चौकटीच्या बाजूने, रामकृपाल तिची ती कला पाहत असत.

६ फेब्रुवारी २०२२ रोजी आपल्या स्वरांच्या राणी लता मंगेशकर आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त “चित्रलतिका” हे अनोखे चित्र प्रदर्शन प्रथमच कोलकातामध्ये आयोजित करण्यात आले आहे.

रामकृपाल नामदेव म्हणतात, “दीदींचे निधन झाले त्यावेळी मी सुद्धा मुंबईत होतो. त्यामुळे मी त्यांच्या शेवटच्या प्रवासात सहभागी होऊ शकलो, दीदी कदाचित आपल्याला सोडून गेल्या असतील पण त्यांचा मधुर, हृदयस्पर्शी आवाज येणाऱ्या युगांच्या स्मरणात राहील. मी आयुष्यभर लता दीदींचे चित्र काढत राहावे ही माझी मनापासून इच्छा आहे.”

“चित्रलतिका” हे प्रदर्शन प्रामुख्याने भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर आधारित आहे. १४ वे चित्रलातिका प्रदर्शन जेमिनी रॉय आर्ट गॅलरी (ICCR), कोलकाता येथे २२ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणार आहे. त्याचे उद्घाटन प्रख्यात अँथॉलॉजिस्ट “लता गीतकोष” संकलक स्नेहसिस चटर्जी आणि प्रसिद्ध संगीतकार सौम्या दासगुप्ता आणि इतर अनेक मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

रामकृपाल यांनी लताजींचे असे चित्र बनवले आहे ज्यात कलाकार, राजकारणी इत्यादींचे १४३६ चेहरे आहेत. माँ सरस्वतीच्या चित्रासह, या व्यतिरिक्त, कलाकृतीमध्ये फुलांची पाने आणि वाद्ये तयार केली गेली. या चित्राचा २०१९ मध्ये एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे.

रामकृपाल यांना २०१४ मध्ये आदरणीय लता मंगेशकर यांना भेटण्याचा विशेषाधिकार मिळाला, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या पेंटिंगवर त्यांची स्वाक्षरी झाली.

रामकृपाल लताजींवर आधारित चित्रे काढत आहेत आणि आतापर्यंत सुमारे पन्नास चित्रांचा संग्रह आहे आणि ही प्रथा अजूनही सुरू आहे.

निःसंशयपणे, कोलकात्यातील लता मंगेशकर रसिक येथे पहिल्यांदाच एका अनोख्या प्रदर्शनाचे साक्षीदार होणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा