You are currently viewing मुणगे सोसायटी अध्यक्षपदी गोविंद सावंत यांची निवड

मुणगे सोसायटी अध्यक्षपदी गोविंद सावंत यांची निवड

मालवण

मुणगे येथील श्री भगवती विविध कार्य. सह. सेवा सोसायटी अध्यक्षपदी श्री गोविंद सावंत तर उपाध्यक्षपदी संजय परुळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निबंधक पियुष जाधव यांनी काम पाहिले. सोसायटीच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य यापुढे राहणार आहे. शेतकरी हा घटक केंद्रबिंदू ठेवून जिल्हा बँकेच्या सहकार्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील शेतकऱ्यांना व्हावा यासाठी सकारात्मक प्रयत्न नेहमी राहतील. सोसायटीला
स्वमालकीची इमारत असावी यासाठी प्राथमिक गोष्टींची पूर्तता चालू असून देवी भगवतीच्या आशीर्वादाने ही बाब सुद्धा पूर्णत्वास जाईल अशी ग्वाही यावेळी नूतन अध्यक्ष गोविंद सावंत यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी सचिव अस्मिता पेडणेकर, सदस्य धर्मजी आडकर, नंदकुमार बागवे, सत्यवान बागवे, यशवंत मुरकर, संजय परुळेकर, विजय पडवळ, प्रकाश सावंत, वासंती पुजारे, प्रभात सावंत, सुरेश बोरकर, विश्वास मुणगेकर आदी उपस्थित होते.सर्व सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. अध्यक्ष गोविंद सावंत, उपाध्यक्ष संजय परुळेकर यांचे अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा