You are currently viewing महाशिवरात्रीसाठी विशेष बस सेवा

महाशिवरात्रीसाठी विशेष बस सेवा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महाशिवरात्रीनिमित्त उद्या १८ फेब्रुवारी रोजी बोरिवली पूर्वेतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेण्यांकडे आणि बाबुलनाथ मंदिरासाठी विशेष बेस्ट बस सोडण्यात येतील. राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी या मार्गावर बसमार्ग क्र १८८ ( मर्या.) च्या सहा अतिरिक्त बस फेऱ्या होतील. वाळकेश्वर ते पी. टी. उद्यान- शिवडी (क्रमांक ५७), वाळकेश्वर ते अँटॉप हिल (क्रमांक ६७ ) आणि वाळकेश्वर ते कुलाबा बस स्थानक ( क्रमांक १०३ ) या मार्गांवर सहा अतिरिक्त बस चालविण्यात येतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =