You are currently viewing संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय जलजीवन मिशन अंतर्गत स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते संपन्न

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय जलजीवन मिशन अंतर्गत स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते संपन्न

ओरोस :-

 

सिंधुदुर्ग नगरी येथील इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालयात जिल्हा परिषद पाणी स्वच्छता मिशन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रभाग जिल्हास्तरीय जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय निबंध चित्रकला वक्तृत्व लघु चित्रपट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, माजी आमदार राजन तेली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, विनायक ठाकूर, प्रभाकर सावंत, निलेश सामंत, सरपंच आशा मुरमुरे, सर्व गटविकास अधिकारी, खाते प्रमुख जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पारितोषक विजेते विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाच्या प्रगतीसाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. स्वच्छता हे आपल्या जिवनाचे ध्येय असले पाहिजे. एखादी ग्रामपंचायत जेव्हा स्वच्छतेच्या ध्येयाने झपाटून काम करते तेव्हा ती ग्रामपंचायत केवळ बक्षीसालाच पात्र ठरत नाही तर ती नागरिकांना दिलेला शब्द देखील पूर्ण करते. त्यामुळे स्वच्छतेच्या ध्येयाने प्रेरित हेाऊन प्रत्येक गावाने काम करण्याचे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले आजचे जग स्पर्धेचे जग आहे. प्रत्येक गोष्टीत स्पर्धा आहे. अशा छोट्या छोट्या स्पर्धेच्या माध्यमातून आपला देश जगाच्या स्पर्धेत जिंकणार आहे. कोकणात आप्पासाहेब पटवर्धन यांनी स्वच्छतेमध्ये खूप काम केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहिम सुरू केल्याने आज आपला देश स्वच्छतेतुन समृध्दीकडे वाटचाल करत आहे. प्रत्येक गावाने स्वच्छते बरोबर उत्पन्न आणि रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी गावात विविध उपक्रम राबवावेत जेणेकरुन गावातच रोजगार निर्माण होईल आणि स्थलांतर होणार नाही. गावाच्या विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने ध्येयाने झपाटून काम करणे आवश्यक आहे. एखादा नवसंकल्पना राबविणारा ग्रामसेवक गावाला दिशा देण्याचे काम करतो. आपला जिल्हा स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आहे. हा क्रमांक आपण कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण समुद्र किनारे स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढेल आणि रोजगारात देखील वाढ होईल असेही ते म्हणाले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी केले तर आभार पाणीपुरवठा विभागाचे माजी कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी मानले.

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे, तेजस्वी आनंद मैस्त्री, जि. प. शाळा मसुरे देऊळवाडा, मालवण, मोहित निळकंठ सुतार, विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली, ओम किशोर चव्हाण, सरंबळ इंग्लिश स्कुल, कुडाळ यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. तर माध्यमिक गटात निशात प्रसाद राणे, विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली, प्राजली विश्वास कदम, शिरगाव हायस्कुल देवगड, निधी दिलीप कदम, विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे रक्कम रुपये २१०००/-, ११०००/-,५५००/- सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ज्युनिअर गटात प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे सौम्या संदेश मणेरकर, सरस्वती विद्यालय कुडासे दोडामार्ग, श्रध्दा सत्यवान मडव, शिवाजी इंग्लिश स्कुल, जाभवडे कुडाळ, श्रध्दा लक्ष्मण नेमणे, पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. तर सिनिअर गटात शेफाली नारायण कशाळीकर, संत राऊळ महाराज महाविद्यालम कुडाळ, श्रावणी संजय गावडे, स.का. पाटिल महाविद्यालय मालवण, रिध्दी बाळकृष्ण कदम, श्री. स.ह. केळकर महाविद्याल देवगड यांनी क्रमांक प्राप्त केला. विजेत्या स्पर्धकांना प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे रक्कम रुपये 21000/-, 11000/-,5500/- सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

जिल्हास्तरीय खुल्या लघुचित्रपट स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे विनोद दळवी, संतोष बादेकर, अनिकेत मिठबावकर यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे रक्कम रुपये 31000/-, 21000/-, 11000/- सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा