You are currently viewing संस्थेसाठी आमदार निधी मंजूर करणारे वैभव नाईक महाराष्ट्रातील पहिले आमदार- संदीप परब

संस्थेसाठी आमदार निधी मंजूर करणारे वैभव नाईक महाराष्ट्रातील पहिले आमदार- संदीप परब

निराधारांसाठी भरीव मदत करता आली याचा आनंद-आ. वैभव नाईक

सविता आश्रमाच्या सभागृह बांधकामासाठी आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून २५ लाख रु. निधी मंजूर;कामाचे भूमिपूजन संपन्न

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत पणदूर येथील सविता आश्रमाच्या सभागृह बांधकामासाठी २५ लाख रुपयाचा निधी मंजूर केला.एखाद्या संस्थेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार निधी मंजूर करणारे वैभव नाईक हे महाराष्ट्रातील पाहिले आमदार आहेत. निरपेक्ष भावनेने आ. वैभव नाईक यांनी स्वतः पाठी लागून कागदपत्रांची पूर्तता करून घेतली आणि हे काम मंजूर करून घेतले. सभागृहाचे काम पूर्ण झाल्यानंतर याचा मोठा फायदा आश्रमातील व्यक्तींना होणार आहे.असे सविता आश्रमाचे विश्वस्त संदिप परब यांनी सांगत आ. वैभव नाईक यांचे आश्रमाच्या वतीने आभार मानले.


आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या पणदूर येथील सविता आश्रमाच्या सभागृह बांधकामाचे भूमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गुरुवारी करण्यात आले. याप्रसंगी आ. वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
आ. वैभव नाईक म्हणाले,अंत्यत कठीण परिस्थितीत अविरत समाजसेवा कशी करावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे संदीप परब आहेत. गेली अनेक वर्षे कोण मदत करेल अथवा न करेल याची वाट न बघता आपल्यावतीने समाज कार्य करण्याचे काम संदीप परब यांनी केलेले आहे. कुटूंबाव्यतिरिक्त २ माणसे सांभाळताना आपल्या नाकी नऊ येतात. मात्र सविता आश्रमात १७० निराधार व्यक्ती याठिकाणी सांभाळल्या जात आहेत.त्यांना जेवण , पाणी, कपडे,आरोग्याच्या सेवा पुरविलेल्या जात आहेत. हे करत असताना संदिप परब यांना आणि संस्थेला अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने या आश्रमासाठी आपल्या माध्यमातून कशी मदत होईल याचा विचार करुन मदतकार्य केले पाहिजे. सभागृहासाठी आमदार फंड मंजूर करताना अनेक अडचणी आल्या मात्र त्यावर मार्ग काढण्यात आला. एखाद्या संस्थेला आमदार निधी मिळण्याचे हे पहिलेच उदाहरण असेल.निराधारांसाठी भरीव मदत करता आली याचा आपल्यालाही आनंद आहे असे आ.वैभव नाईक यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,माजी उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, उपतालुकाप्रमुख बाळू पालव,पावशी विभागप्रमुख दीपक आंगणे,सविता आश्रमाचे विश्वस्त संदिप परब,सरपंच पल्लवी पणदुरकर, उपसरपंच साबाजी म्हस्के, महिला आघाडी विभागप्रमुख मृणाल परब, अना भोगले, बाळू गावकर,उल्हास पणदूरकर,आबा सावंत, राजश्री टंकसाळी, किशोरी जाधव, शामसुंदर सावंत, आबा साईल, प्रभाकर साईल, प्रताप साईल, वामन साईल, विजय साईल, बाबू सावंत, शिवराम पणदूरकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − one =