You are currently viewing मोहोर हिरव्या पाचूचा

मोहोर हिरव्या पाचूचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम लेख*

 

*मोहोर हिरव्या पाचूचा*

 

*नवयौवना धरा*

 

थंडीने शिशीरही गारठला…गारठला आसमंत सारा.. निष्पर्ण वृक्षराजी.. धरेवर पडला पाचोळ्याचा सडा… निष्क्रीय..उदास धरा…

झुळुक आली वा-याची…दूत वसंत राजाची… बा..आदब…बा मुलाहिजा…ऋतुराज वसंत पधार रहे है….. .. संजीवन उबदार सोनकिरणांनी…निच्चेष्ट धरेस आलिंगले….नी फुंकले हो प्राण… धरा झाली सचेतन…नाचू लागले तनमन…दंवबिंदुंनी घातले सचैल स्नान.. धरेने प्राशिले नवसंजीवन..

वृक्षराजी बहरली…कोवळी पोपटी तकतकीत पालवी फुलली.. त्या वरी दंवबिंदुंची शिंपण… हिरव्या पाचूची भासे पखरण.. आम्रवृक्ष मोहरला….सुगंध बिखरला….पिवळसर..मोहोर चकाकला… कोकीळ पक्षी नव तराणे गाऊ लागला…

केशरी लाल पळस फुलारला… चैतन्य ओसांडू लागला… पिवळा बहावा बहरला…धरेस पीत हलदी वस्त्र अर्पिता झाला. नवयौवना धरा.. हळदुली वसुंधरा …सजली नववधूसम…. लज्जीत.. अवगुंठीत… पितांबरी ल्याली… हिरव्या पाचूच्या अलंकारांनी नटली…..प्रतिक्षा तिला तिच्या राजाची.. क्षितिजी लाल रंगाची उधळण..

मधूनच पर्जन्याची पखरण… अवकाशी कधी बिजलीची चमचम… मेघगर्जनेची वाजंत्री.. ढमढम… इंद्र धनुच्या सप्तरंगी मांडवात… निर्झराची नुपुरे रूणझुणवीत… मोहक पदन्यासाने प्रवेशित …नवयौवना धरा राजपुत्राला वरिती झाली..

आनंद ओसांडला… चैतन्य बहरला… लग्न सोहळा संपन्नला..

 

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा