You are currently viewing जनावरांच्या छावणीस खाद्य – चारा वाटप करुन वाढदिवस साजरा

जनावरांच्या छावणीस खाद्य – चारा वाटप करुन वाढदिवस साजरा

 

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील सामाजिक कार्यकर्ते किरण लंगोटे यांनी आपला वाढदिवसावरील इतरत्र खर्च टाळत माणुसकी फौंडेशनच्या छावणीतील जनावरांसाठी खाद्य व चारा वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

माणुसकी फौंडेशनने लम्पीबाधित जनावरांसाठी छावणी सुरु केली आहे.या छावणीत जनावरांवर योग्य उपचार व काळजी घेण्यात येत असल्याने अनेक जनावरे बरी होत आहेत.विशेष म्हणजे लम्पीबाधित जनावरांसाठी
ही छावणी राज्यातील पहिली ठरली आहे.त्यामुळे या छावणीतील जनावरांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत.याच अनुषंगाने येथील सामाजिक कार्यकर्ते किरण लंगोटे यांनी आपला वाढदिवसावरील इतरत्र खर्च टाळत माणुसकी फौंडेशनच्या छावणीतील जनावरांसाठी खाद्य व चारा वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.हा कार्यक्रम कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बॅंकेचे संचालक स्वप्निल आवाडे , ताराराणी पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी किरण लंगोटे ,एम.के. कांबळे, संजय जगताप, किशोर पाटील, जयपाल हेरलगे, किशोर निंबाळकर, अभिजित पटवा,प्रशांत कांबळे, राहुल जगताप यांच्यासह माणुसकी फौंडेशन चे प्रथमेश इंदुलकर , चैतन्य चव्हाण,संजय कांबळे उपस्थित होते.यावेळी किरण लंगोटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + five =