You are currently viewing आंबोलीत राजे प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

आंबोलीत राजे प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

सावंतवाडी 

राजे प्रतिष्टान कामतवाडी आंबोली यांच्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मशाल आणणे,त्यानंतर शिव जन्मोत्सव,लहान मुलांचे शिवाजी महाराजांवरील कार्यक्रम,फोटो प्रदर्शन,बक्षीस वितरण,मिरवणूक असे कार्यक्रम करण्यात आले. येथील कामतवाडी येथे राजे प्रतिष्ठान तर्फे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरा करण्यात आला.

यावेळी कामतवाडी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष उल्हास गावडे, बबन गावडे, योगेश गावडे, गुणाजी गावडे, भिसाजी गावडे, विलास गावडे, सतीश गावडे, भिवा गावडे, चेतन गावडे,संदेश राणे,संतोष नाटलेकर,शंकर सावंत,अरविंद गावडे, अनंत पडते,लक्ष्मण गावडे, अनिल गावडे, अंकुश गावडे, दशरथ गावडे, सोमा गावडे, प्रसाद गावडे, शंकर गावडे,तसेच सर्व कार्यकर्ते महिला उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर सरपंच सावित्री पालेकर,पंचायत समिती माजी सदस्य संदीप गावडे,गेळे सरपंच सागर ढोकरे,केंद्रप्रमुख आर.बी.गावडे,सोसायटी चेअरमन शशिकांत गावडे, जगन्नाथ गावडे, शिक्षक श्री कोल्हे,मोहन पाटील, विजय राऊत,उपस्थित होते.

या ठिकाणी प्राथमिक शिक्षक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी कलाकार विशाल गावडे, खेळाडू प्रथमेश गावडे, चित्रकार शुभम गावडे,अनंत पडते यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मान्यवरांनी छत्रपतीशिवाजी महाराजांबद्दल मनोगत आणि भाषणे केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा